Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आधार फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.    या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर , आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष  खैरे, केंद्रप्रमुख अनिल पलांडे, केंद्रप्रमुख लंघे, शाळेच्या…

Read More
Swarajyatimesnews

गोरगरिबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – संस्थापक विठ्ठल ढेरंगे

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : परिसरातील शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या अनेक गरजांना साथ देत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे तसेच आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून, मागील ३६ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठल ढेरंगे यांनी केले. संस्थेची ३६ वी वार्षिक सभा चेअरमन नामदेव ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More
Swarajyatimesnews

टाकळी हाजीचे सुपूत्र दत्तात्रय चिकटे गुरुजींना ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आणि विद्यार्थीहितासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे शिरूर तालुक्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचवणारे टाकळी हाजी गावचे सुपुत्र  दत्तात्रय अनंतराव चिकटे गुरुजी  यांची “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणे येथे…

Read More
Swarajyatimesnews

सरपंच संदीप ढेरंगे यांच्यामुळे कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीत पोहोचल्याचा अभिमान – उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमाचे (ता. शिरूर) सरपंच संदीप ढेरंगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणासाठी विशेष निमंत्रण मिळाल्याने कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. सरपंच ढेरंगे यांच्या विकासकामांची दखल थेट दिल्लीत घेतली गेल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी काढले. या निमंत्रणाबद्दल बोलताना प्रशांत ढोले म्हणाले,…

Read More
Swarajyatimesnews

निलंबित पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई – सेवेतून निलंबित असलेले माजी पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (सोमवारी) रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. परळी तालुक्यातील नागदरा हे मूळ गाव असलेले सुनील नागरगोजे हे अनेक वर्षांपासून अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत त्यांनी पोलिस सेवेत…

Read More
Swarajyatimesnews

मुंबईतील ‘मराठा’ बांधवांना कोरेगाव भीमाचा आधार: लोणचे,चटण्या,बिस्किटे ,पाणी बॉटल्ससह चपात्या पाठवल्या एक हजार

पुणे – मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील अखिल म्हसोबा नगर गणेश मित्र मंडळ, जय जिजाऊ महिला ग्रामसंघ, ढेरंगे वस्ती येथील बांधवांनी व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत मदतीचा मायेचा हात दिला आहे. आंदोलक बांधवांना जेवण आणि पाणी कमी पडू…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये रेकॉर्डवरील आरोपीचा पोलिसांवर गुप्तीने हल्ला दोन पोलिस जखमी तर प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आरोपीचा मृत्यू

शिक्रापूर (ता. शिरूर): येथील मलठण फाट्यावर आज (दिनांक ३० ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता एक थरारक घटना घडली. सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात घरफोडीचा आरोपी लखन भोसले (वय २५, रा. खटाव, जि. सातारा) याने त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गुप्तीने हल्ला केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सातारा पोलिसांना हवा असलेला…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमाच्या सानवी मोटेची राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड 

पुणे: ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ९५४ कोरेगाव पुनर्वसनची विद्यार्थिनी कुमारी सानवी अतुल मोटे हिने लक्षवेधी यश मिळवले आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत, सानवीची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने सादर केलेल्या ‘छावा’ या ऐतिहासिक नाट्यछटेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. सानवी मोटेचे…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील जुने उद्योजक हरिभाऊ ढेरंगे यांचे निधन

कोरेगाव भीमा: येथील जुन्या जाणत्या पिढीतील आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असणारे हरिभाऊ दौलती ढेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लिंब चौकातील हरिभाऊ ढेरंगे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लाकूड वखारीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कोंबड खत व शेणखत पुरवण्याचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि आदर्शवत पद्धतीने उभा केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सन्मान कोरेगाव भीमाच्या सुपुत्राचा… पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळालेल्या संतोष घावटे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गावातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेले सुपुत्र संतोष घावटे यांनी यशाचा नवा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावत त्यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती मिळाली असून, त्यांच्या या यशामुळे कोरेगाव भीमा ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यशानिमित्त ग्रामपंचायतीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. संतोष घावटे…

Read More
error: Content is protected !!