धक्कादायक! लोणी काळभोर येथे कार अंगावरून गेल्याने पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू
चिमुरड्याच्या रक्ताळलेल्या देहाला कवेत घेताना चालकाचेही हात थरथरले ! लोणी काळभोर (ता.हवेली) आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत ज्या अंगणात तो हसला, बागडला आणि ज्या मातीत त्याने स्वप्नांचे किल्ले रचले, त्याच मातीत नियतीने त्याच्या आयुष्याचा खेळ मांडला. लोणी काळभोर येथील एका सोसायटीच्या आवारात खेळताना पाच वर्षांच्या निष्कर्ष रेड्डी या चिमुरड्याचा गाडीखाली चिरडून अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेने केवळ…
