
सणसवाडीत कोसळले अवाढव्य होर्डिंग; सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक ठप्प
सणसवाडी (ता. शिरूर), ता. २० मे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी मुख्य चौकात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे एक मोठे होर्डिंग कोसळले. सुमारे ३० फूट लांब, ३० फूट रुंद व ३० फूट उंचीचे हे अवाढव्य होर्डिंग महामार्गाच्या दिशेने कोसळले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने, होर्डिंगच्या खाली असलेल्या दुकानांतील नागरिक वेळेवर…