सखे, मला माफ कर, तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.’ शिरीष महाराजांचे भावी पत्नीसाठी काळीज पिळवटून टाकणारे अखेरचे शब्द
पुणे – माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू….