मांडवगण येथे चार एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे बारा लाखांचे नुकसान
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गट नं. ६१७ मधील चार एकर ऊस सोमवारी (ता. २५) सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीजवाहक तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ठिबक सिंचनासह १६ महिन्यांचे ऊस पीक जळून शेतकरी अविनाश बापूराव सोनवणे यांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे शाखा अभियंता इर्शाद…