काशी विश्वनाथ दर्शन व गंगेच्या आरतीत भक्तांची किरण साकोरेंच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रार्थना
पुणे: वाराणसी,काशीच्या पवित्र घाटांवर सोमवारी सायंकाळी भक्तिभाव, श्रद्धा आणि शांततेचे वातावरण अनुभवायला मिळाले. लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य आणि अध्यात्मिक अनुभव घेतला. आरतीचा दिव्य क्षण : संध्याकाळी लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या लहरींवर थरथरणाऱ्या दीपज्योतींनी घाट उजळून निघाला. शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापराच्या सुवासाने वातावरणात पवित्रतेचा भाव पसरला. या आरतीचे औचित्य…
