
धक्कादायक! अंबिका कला केंद्रात झाला गोळीबार, चौघांवर गुन्हा दाखल
पुणे जिह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात सोमवारी (दि. २१) रात्री उशिरा, अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार व्यक्तींविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी दिली. अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आंधळे यांनी या घटनेबाबत यवत पोलीस…