
शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!
दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…