
संत निरंकारी मिशनतर्फे शिक्रापूर येथे रक्तदान शिबिर; १४५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शिक्रापूर, (ता. शिरूर)सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारे शिक्रापूर येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेच्या सेवेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.रक्तसंकलनाचे कार्य यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले. या शिबिराचे उद्घाटन…