
टाकळी हाजीचे सुपूत्र दत्तात्रय चिकटे गुरुजींना ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आणि विद्यार्थीहितासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे शिरूर तालुक्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचवणारे टाकळी हाजी गावचे सुपुत्र दत्तात्रय अनंतराव चिकटे गुरुजी यांची “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणे येथे…