
सणसवाडीतील (वसेवाडी) जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींनी साकारली श्री गणेशाची अद्भुत कलाकृती
सणसवाडी (ता. शिरूर): वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर बुद्धीची देवता श्री गणेशाची सुंदर कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमात तब्बल २१५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गणेशोत्सवाच्या पावन पार्श्वभूमीवर साकारलेली ही कलाकृती समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ तिचं कौतुक करत आहेत. गणेशमूर्तीचे प्रत्येक अंग मुलांनी बारकाईने…