काशी दशाश्वमेध घाटावर भक्तांचे स्वर—“भगवंता! आमच्या किरणची सर्व स्वप्ने पूर्ण कर!”
लोणीकंद–पेरणे गटातील भाविकांनी अनुभवली काशी विश्वनाथ दर्शन यात्रा आणि गंगेची दिव्य आरती, पै. किरण साकोरे यांचा सेवाभाव वाराणसी/पुणे – काशी ही भक्ती, अध्यात्म आणि शांततेने नटलेली नगरी. रविवारी सायंकाळी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य सोहळा सुरू होताच संपूर्ण घाट दीपज्योतींनी उजळून निघाला. लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहरणाऱ्या ज्योती, शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापूराचा सुवास यामुळे येथे…
