खेड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पर्वते यांचे ऑन ड्युटी हृदयविकाराने निधन
पुणे – खेड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. मुळगाव अकलूज, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या पर्वते यांची काही महिन्यांपूर्वीच खेड येथे बदली झाली होती. सकाळी कामावर आल्यावर अचानक त्यांना झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला….