MPSC च्या पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम येत धाराशिवच्या महेश घाटुळे यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड
चिकाटी, कठोर परिश्रम, आणि अभ्यासातील सातत्य याच्या बळावर धाराशिव जिल्ह्यातील घारगावच्या डॉ. महेश अरविंद घाटुळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या निकालात पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम येत उपजिल्हाधिकारी पदावर यशस्वी झेप घेतली आहे. अवघ्या २९ वर्षांच्या महेश यांनी आपल्या या यशाने कळंब तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.(MPSC) महेश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत…