अजित ‘दादां’चा शब्द अन् राष्ट्रवादीची सरशी; मांढरेंची माघार, तर भाजपची मोठी नाचक्की!
शिक्रापूर (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक १८ मध्ये अखेर नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार माऊली कटके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर विद्यमान सदस्य कुसुम आबाराजे मांढरे यांनी बंडाचे निशाण खाली घेत माघार घेतली. मात्र, याच वेळी…
