माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान

Swarajyatimesnews

सणसवाडी (ता.शिरूर) येथे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला  व बालकांना अन्नदान करण्यात आले.

माजी  आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील माजी आमदार अशोक पवार यांचे जिवाभावाचे निष्ठावान समर्थक माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण,वृध्द, महिला व बालकांना अन्नदान करत आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी माहेर सस्थेतील  मनोरुग्ण ,वृद्ध,महिला  व बालकांना अन्नदान करण्यात आले.यावेळी माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराने स्वतः जेवण वाढले तसेच माहेर मधील  मनोरुग्ण ,वृद्ध,महिला  व बालकांशी संवाद साधला. पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराकडून मागील दहा वर्षांपासून बाहेर संस्थेमध्ये व इतर सामाजिक कार्याद्वारे माजी आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.

     यावेळी  दिव्यांग बांधवांच्या हस्ते केक कापण्यात आला तसेच त्यांना गोडाचा खाऊ देण्यात आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

     यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य  पंडित दरेकर, शिरूर मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, सणसवाडीच्या सरपंच रूपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर , शिरूर काँग्रेस यांच्या अध्यक्ष वैभव यादव , माजी चेअरमन सुहास दरेकर, कैलास दरेकर , ग्रामपंचायत  सदस्या ललिता दरेकर, सुनीता दरेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ दरेकर, उद्योजक सुभाष दरेकर , विठ्ठल दरेकर, निलेश दरेकर प्रशांत दरेकर, प्रवीण वाखारे ,शाम दरेकर, प्रदीप  म्हेत्रे ,संतोष शेळके, श्री निवास कांचन, बाळकृष्ण दरेकर, गणेश हरगुडे ,अशोक करडे ,पंढरीनाथ गोरडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!