दि. ०४ सप्टेंबर – आलेगाव पागा (ता.शिरूर) येथे एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारा निंदनीय घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून फिर्यादी च्या घरासमोरील पढवीत १३ वर्षांच्या अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला शिरूर पोलिसांनी तात्काळ अटक करण्यात आली आहे.
आलेगाव पागा (ता.शिरूर) येथे अल्पवयीन पीडितेस मी तुझे आजीला नाव सांगेन अशी धमकी देऊन तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अशोक सोनवणे (रा.आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावरबाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदयानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गीरी करत आहे.