मुंबई – दि.४ जानेवारी सज्जनांची निष्क्रियता ही राष्ट्र घसरणीला कारणीभूत ठरते. तर, सज्जनांनी सक्रिय होणे हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असते, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेठ गोकुळदास तेजपाल नाट्यगृहात चाणक्य या नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला हजेरी लावली. या प्रसंगी बोलताना त्यांनी मनोज जोशी यांच्या अभिनयाची प्रशंसा केली आणि आर्य चाणक्य यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांचे गोकुळदास तेजपाल, नाट्यगृह येथे चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगा प्रसंगी मुख्यमंत्री ददेवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
“एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग ही खरोखरच हिमालया एवढी बाब आहे.पस्तीस वर्षांपासून मनोज जोशी हे चाणक्याची भूमिका करून एका विचारप्रवाहाला लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. हे नाटक राष्ट्रहिताचे कार्यच आहे,” आर्य चाणक्य यांचे विचार आजही मार्गदर्शक असून, त्यांच्या विचारांचा स्वीकार पिढ्यान्पिढ्या होत राहिल्यास देशाची संस्कृती आणि परंपरा सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त करत चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला उपस्थिती ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असे मत व्यक्त केले.