छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी घेतले दर्शन

Swarajyatimesnews

वढू बुद्रुक ( ता.शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे,कवी कलश समाधी व गोविंद गोपाळ यांचे  दर्शन महाराष्ट्र विधान सभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतले.

यावेळी वढू बुद्रुक ग्राम पंचायतीचे सरपंच माऊली भंडारे, कोरेगाव भीमाचे सरपंच संदिप ढेरंगे, माजी सरपंच अंकुश शिवले,विजय गव्हाणे, माजी उपसरपंच रमाकांत शिवले,संतोष शिवले, लाला तांबे, ग्राम पंचायत सदस्य कृष्णा अरगडे,सतीश लांडगे, नाना काटे संजय अवसरमल शशी घुले निलेश पंढरकर आशिष लांडगे दातीर पाटील ग्राम विकास अधिकारी बिबवे भाऊसाहेब, रतन दवणे, सदानंद फडतरे, रविंद्र शिंदे व शंभू भक्त उपस्थित होते.

    यावेळी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने दोन निवेदने देण्यात आली यामध्ये छत्रपती संभाजाई महाराज यांच्या एका निवेदनात पुण्यतिथीच्या दिवशी शासकीय सुट्टी देण्यात यावी व दुसऱ्या निवेदनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हेलिकॉप्टर द्वारे शासनाच्या वतीने पुष्प वृष्टी करण्यात यावी असे निवेदन दिल्याचे स्मृती समितीचे अध्यक्ष सोनमाथ भंडारे,उत्तम भंडारे, संजय भंडारे, अनिल भंडारे, सचिन भंडारे यांनी सांगितले.

कोरेगाव भिमा ते पिंपळे जगताप रस्ता होणेबाबत व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करतात येण्याबाबत निवेदन ग्राम पंचायत वढू बुद्रुक पदाधिकाऱ्यां दिले.

उपमुख्यमंत्री यांचे अत्यंत विश्वासू व पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथून तीन वेळा आमदार राहिले आहेत.त्यांची नुकतीच बिनविरोध महाराष्ट्र. विधानसभेच्या उपसभापती निवड झाली त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक येथील समाधी स्थळाला भेट देत नतमस्तक झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!