theswarajyatimes@gmail.com

Swarajyatimesnews

संत कान्हुराज महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने  पंढरपूरकडे रवाना

पालखी सोहळ्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष… केंदुर (ता.शिरूर) संतश्रेष्ठ कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात दिमाखाने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’, ‘कान्हुराज महाराज की जय’ अशा अखंड जयघोषात, टाळ-मृदंगांच्या निनादात, कपाळी गोपीचंद टिळा, गळ्यात टाळ, मुखात नाम आणि डोळ्यांत पंढरीच्या भेटीची असीम ओढ घेऊन हजारो वारकरी भक्तांच्या उत्स्फूर्त…

Read More
Swarajyatimesnews

 शिवहर्ष कंद यांची आंतरराष्ट्रीय भरारी, लोणीकंदच्या सुपुत्राचा विदेशात डंका

‘माझं शिक्षण नोकरीसाठी नाही, भारताच्या ग्रामीण भागासाठी व शेती विकासासाठी!’ – हर्ष कंद  लोणीकंद (ता.हवेली) -“स्वप्न मोठी पाहा, पण तुमची मुळे कधीही विसरू नका!” – ही प्रेरणा मनात घेऊन शिवहर्ष प्रदीप कंद या ध्येयवेड्या तरुणाने महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतून थेट अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात उत्तुंग भरारी घेतली. केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या शिक्षणाच्या जोरावर समाजासाठी काहीतरी भव्य करण्याच्या…

Read More
Swarajyatimesnews

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

आळंदी ( ता. खेड) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी भक्तीचा अनोखा साज चढला आहे! नांदेड येथील निष्ठावान वारकरी, भारत विश्वनाथ रामीनवार यांनी आपल्या असीम श्रद्धेचे प्रतीक म्हणून आळंदी मंदिरास तब्बल एक किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या देदीप्यमान मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून, रामीनवार यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा हा एक…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे फुलांच्या वर्षावात पहिलीतल्या चिमुकल्यांचे शाळेत स्वागत

“मुलं तुमची, झाडं आमची” उपक्रमाने पालकही आनंदी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बालचमु आनंदाने शाळेत दाखल होताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले. फुलांच्या वर्षावात आणि वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला….

Read More
Swarajyatimesnews

Jejuri Accident : जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघातात आठ ठार, पाच जण गंभीर जखमी

जेजुरी – जेजुरी-मोरगाव रोडवरील श्रीराम ढाब्याजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये ढाब्यासमोर उभे असणारे व टेम्पोमधील साहित्य उतरवणारे नागरिक आणि स्विफ्ट डिझायर कारमधील प्रवासी यांचा समावेश आहे.  पुण्याहून मोरगावकडे भरधाव वेगाने निघालेली स्विफ्ट डिझायर कार (MH 42 AX…

Read More
Swarajyatimesnews

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो दिंड्या आणि मानाच्या पालख्यांसह वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने, विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन वारकऱ्यांची पायी वारी सुरु झाली आहे. ऊन, पाऊस, वादळ, वाऱ्याची तमा न बाळगता वारकरी आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेने वाटचाल करत आहेत. पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध…

Read More
Swarajyatimesnews

द टाटा पॉवर कंपनी लि. चे ७/१२ वरील नाव कमी करणे प्रकरणी  मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित

७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी कारवाई पुणे, १७ जून २०२५: मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना ७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ निलंबित केले आहे. द टाटा पॉवर कंपनी लि. चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कासाठी नोंदवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. या निलंबनामुळे…

Read More
Swarajyatimesnews

ऑनलाईन रम्मीच्या नादाने कर्जबाजारी,जमीन, घर गेले अखेर पत्नी व दोन वर्षांच्या लेकराची हत्या करत संपवलं जीवन

अख्ख कुटुंब संपलं; धाराशिवमधील मन सुन्न करणारी घटना धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाईन रम्मीच्या नादातून कर्जबाजारी झालेल्या 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश नावाचा दोन…

Read More
Swarajyatimesnews

नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू; गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…

आजरा शहरात एका नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांनी विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आंबोली येथे फिरायला…

Read More
Swarajyatimesnews

बायकोसाठी कायपण! मध्य प्रदेशात पतीने पत्नीसाठी बांधलं ताजमहालासारखं घर

मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या आवडीनुसार खास ताजमहालसारखं आलिशान घर बांधलं आहे. आनंद प्रकाश चौकसे असं या गृहस्थाचं नाव असून, त्यांनी आपल्या पत्नीसाठी 4BHK घर उभारलं आहे.हे घर पाहताना खरा ताजमहालच समोर आहे असं वाटतं. पांढऱ्या मकराना संगमरवरातून उभारलेलं हे घर आकाराने मूळ ताजमहालाच्या तुलनेत एक तृतीयांश लहान आहे, पण सौंदर्य आणि…

Read More
error: Content is protected !!