
अपशिंगे मिलिटरीत लोकनियुक्त सरपंचांविरोधात गावकऱ्यांचे गुप्त मतदान
अविश्वास ठराव २५६ मतांनी मंजूर, जिल्ह्यातील पहिलीच घटना सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी गावात शुक्रवारी (दि.१२) झालेल्या मतदान प्रक्रियेत लोकनियुक्त सरपंचांविरोधात अविश्वास ठराव प्रथमच मंजूर करण्यात आला. या घटनेने केवळ अपशिंगेच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. गावातील सरपंच तुषार शिवाजी निकम यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता. लोकनियुक्त सरपंच निवडून…