शिरूर विधानसभेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके ७४,५५० मताधिक्याने विजयी

स्वराज्य टाईम्स न्यूज

हा विजय स्व.बाबुराव पाचर्णे यांना समर्पित करत असून हा विजय सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचा विजय आहे. – नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके

जय महाकाल, डमरू वाजणार….घड्याळ येणार या घोषणेसह माता माउलींनी दिलेला आशीर्वाद माझा माऊली आमदार होणार अखेर आला फळाला 

पुणे – राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी असणाऱ्या १९८ शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी १,९२,२८१  मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार  आमदार ॲड अशोक पवार यांचा  ७४,५५० मतांच्या फरकाने पराभव केला. 

शिरूर हवेली मध्ये झालेल्या मतदानापैकी महायुतीच्या ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना १,९२,२८१ मते मिळाली तर ॲड अशोक पवार यांना १,१७,७३१ इतकी मते मिळाल्याने ७४,५५० मतांच्या फरकाने ॲड अशोक पवार यांचा पराभव केला असून शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत गुलाबी वाऱ्याने चांगलाच जोर धरल्याची चर्चा रंगत आहे.

अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या खालील वेबसाईट ला भेट द्या.

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/candidateswise-S13198.htm

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तडाखेबंद प्रचार सभा, त्याला झालेली अभूतपूर्व गर्दी, शिरूर हवेलीत मिळालेला उदंड प्रतिसाद, उज्जैन यात्रा,लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत,शिक्षण,राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, माजी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी प्रामाणिक व निष्ठेने पार पडलेली जबाबदारी त्यांच्यासमवेत महायुती व भाजपाची एकवटलेली वज्रमूठ, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे व महायुतीचे शिरूर हवेली तालुक्यातील एकवटलेले आजी माजी पदाधिकारी, समाज माध्यमांचा प्रभावी वापर, प्रचारातील अचूक व लोकांना भावणारे मुद्दे तरुणाई व महिला भगिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद अशा अनेक कारणांनी माऊली कटके यांच्या विजयात मोलाचे योगदान दिले असून अखेर हवेलीच्या सादेला प्रतिसाद देत शिरूर करांनी भावाची भूमिका बजावल्याची भावना व्यक्त होत आहे.

जय महाकाल, डमरू वाजणार….घड्याळ येणार या घोषणेसह माता माउलींनी दिलेला आशीर्वाद माझा माऊली आमदार होणार हा आशीर्वाद कामी आला असून वाबळेवाडी करांनी गावोगावी फिरत मांडलेली व्यथा, तळेगाव ढमढेरे येथे ज्येष्ठ शेतकरी यांनी दाखवलेले ऊसाचे कांडे, शेतकऱ्यांचे फलक यामुळे निवडणूक चुरशीची झाली असली त्यावर गुलाबी वाऱ्याचा चांगलाच प्रभाव होता.

अखेर कालभैरव जयंतीच्या दिवशी नेत्रदीपक यश मिळवत – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)चे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी ७४,५५० मतांनी दणदणीत विजय प्राप्त करत ॲड. अशोक पवार यांचा पराभव केला.

महाकाल काळभैरवनाथ पावला – शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत उज्जैन यात्रा हा मुद्दा अत्यंत चर्चेचा ठरला होता. माऊली कटके यांनी उज्जैन यात्रा काढत यात्रेकरूंची मुलासारखी  श्रावणबाळ म्हणून केलेली सेवा यामुळे अनेक भाविकांनी व उज्जैन यात्रेकरूंची माऊली कटके यांच्या प्रचाराची धुरा स्वयंस्फूर्तीने हाती घेतली होती.गावोगाव उज्जैन यात्रेच्या माताभगिनी उत्सुर्त माऊली कटके यांचे स्वागत करत होत्या.

तसेच काळभैरवनाथ जयंतीच्या दिवशी निकाल आल्याने व मोठ्या फरकाने माऊली कटके यांचा विजय झाल्याने डमरू वाजला कालभैरव पावला अशी चर्चा सुरू होती.

 १९८ शिरूर विधानसभेच्या निकालाकडे पूर्ण जिल्ह्याचे  लक्ष लागले होते.शरद पवार यांच्याशी निष्ठावान अभ्यासू ,कार्यसम्राट असणाऱ्या अशोक पवार यांच्या विजयासाठी  माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची सभा व सहानुभूती,आमदार जयंत पाटील , खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची आक्रमकता, पंधरा वर्षांचा निवडणुकीचा अनुभव,विकास कामांचा डोंगर, गावागावात दांडगा लोकसंपर्क, माजी सभापती सुजाता पवार पवार यांच्यासह निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज या जमेच्या बाजुंसह बंद पडलेला रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, यशवंत सहकारी साखर कारखाना, वाबळेवाडी शाळा प्रकरण, चेअरमन ऋषिराज पवार प्रकरण, मयुरी रेसिंडेसी प्रकरण यासह शिरूर हवेली अनेक दिग्गज समवेत असूनही अशोक पवार यांचा झालेला पराभव हा धक्कादायक व आश्चर्य कारक असून त्याची चर्चा संपूर्ण मतदार संघासह पुणे जिल्ह्यात रंगत आहे. 

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/ConstituencywiseS13198.htm

हा विजय स्व.बाबुराव पाचर्णे यांना समर्पित करत असून हा विजय सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचा विजय आहे. –आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!