सणसवाडी येथील बी. एस. पॅकेजिंग इंडस्ट्रिज, सणसवाडी युनिट – १ आणि युनिट – २ चे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामीण भागातील नवउद्योजकांनी व्यवसायात सचोटी,चिकाटी व सातत्याने प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते यासाठी भूमिपुत्रांनी व युवकांनी पुढे यायला हवे.नोकरी शोधणारा नव्हे तर उद्योग उभरणारा व्हायला हवे तसेच या उद्योगाची उभारणी एका महिलेने केली असून उद्योग क्षेत्रातील आदर्श उदाहरण आहे.आता सणसवाडी येथील उद्योग क्षेत्रातही महिला उद्योजकांनी आघाडी घेतल्याचे हे एक आदर्श उदाहरण असल्याचे मत आमदार अशोक पवार यांनी सणसवाडी येथील बी. एस. पॅकेजिंग इंडस्ट्रिज, सणसवाडी युनिट – १ आणि युनिट – २ चे उद्घाटन उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

सणसवाडी येथील बी. एस. पॅकेजिंग इंडस्ट्रिज, युनिट – १ आणि युनिट – २ ची उभारणी खूप चांगली झाली असून यातून अनेकांना रोजगार मिळणार असून सोनल सोमनाथ खोले- वारघडे, सोमनाथ खोले यांनी व्यवसायाची उभारणी करत ग्रामीण भागातील तरुणाई समोर एक आदर्श ठेवला असून व्यवसायाची वाढ होण्यासाठी कायम प्रयत्नशील रहा असे आमदार अशोक पवार यांनी मत व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, सरपंच रुपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर,काँग्रेसचे वैभव यादव, शिक्रापुरचे आदर्श सरपंच रमेश गडदे,सणसवाडी ग्राम पंचायत सदस्य अक्लषय कानडे,लिता दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, ग्राम पंचायत सदस्या पूजा भुजबळ,माजी ग्राम पंचायत सदस्या सुनीता उत्तम दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामदास दरेकर, उद्योजक दगडू दरेकर, निलेश दरेकर, सुखदेव दरेकर, प्रशांत दरेकर, बाळकृष्ण दरेकर मान्यवर उपस्थित होते.
