जुन्नर – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुःखद घटण घडली असून रस्त्यावर कार व मोटारसायकल यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये पुण्यातील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने एक आख्खे १३ वर्षांचा मुलीचा कुटुंबच मृत्यू मुखी पडले आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सितेवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
हा अपघात इतका भीषण होता की या धडकेमध्ये निलेश कुटे, त्यांची पत्नी जयश्री कुटे आणि १३ वर्षांची मुलगी सानवी कुटे यांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील रहिवासी असणारे निलेश कुटे बुधवारी मोटरसायकलवरून पत्नी जयश्री आणि मुलगी सानवी हिला घेऊन कल्याणकडे जात होते. तेव्हा सितेवाडी गावाच्या हद्दीत आल्यानंतर कल्याणकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या कारची आणि कुटे यांच्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली.यामध्ये कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला.