बीड जिल्ह्यातील अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात डॉक्टर बहीण-भावाचा मृत्यू झाला तर . डॉकटर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.डॉ. ओम ज्ञानोबा चव्हाण आणि त्यांची चुलत बहीण डॉ. मृणाली शिंदे अशी मृतांची नावे आहेत.
मानवत तालुक्यातील वझुर बु. येथील हे दोघे डॉक्टर जेजुरी येथे खंडेरायाचे दर्शन घेऊन परतत होते. कार (एम.एच.२२, ए.एम.४७५१) पुलाला धडकल्याने अपघात झाला.या कारमध्ये नवविवाहित डॉक्टर मंथन चव्हाण आणि त्यांच्या पत्नीही होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.डॉ. मंथन चव्हाण यांचा विवाह नुकताच पार पडला होता. देवदर्शनासाठी ते वझुर येथील चुलत भाऊ डॉ. ओम चव्हाण आणि कानसुर येथील बहीण डॉ. मृणाली शिंदे यांच्यासोबत गेले होते.
अपघातामुळे वझुर व कानसुर गावांवर शोककळा पसरली आहे. डॉ. ओम चव्हाण यांच्यावर वझुर येथे तर डॉ. मृणाली शिंदे यांच्यावर कानसुर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.