माऊली कटके यांच्या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण
शिरूर – पुणे जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा व चुरशीचा असलेल्या शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राहुल पाचर्णे, अरुण गिरे, रवींद्र काळे,दिलीप वाल्हेकर, गणेश कुटे, भगवान शेळके ,सुधीर फराटे, रामभाऊ सासवडे उपस्थित होते.
मंगळवार दि.२९ ऑक्टोंबर २०२४ रोजी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथून श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली ला सुरुवात करण्यात आली. शिरूर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके वाघोली येथील वाघेश्वराचे दर्शन घेवून शक्ती प्रदर्शन करत मंगळवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला.
यावेळी प्रतिक्रिया देताना उमेदवार माऊली कटके यांनी शिरूर हवेली मतदार संघाचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्याशी लढत होणार असून येथे महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
यावेळी ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर हवेलीच्या विद्यमान आमदारांना जनता वैतागलेली आहे, मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, रोजगाराचे, शिक्षणाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच या मतदार संघातील बंद पडलेले घोडगंगा सहकारी साखर कारखाना व यशवंत साखर कारखाना सुरू करण्यासाठी जनता नक्कीच मला साथ देईल असा विश्वास यावेळी माऊली कटके यांनी व्यक्त केला.वाहतूक कोंडी,बेरोजगारी व शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार सभेस अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण –
कटके यांच्या शिरूर येथील पाचकंदिल सभेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती मोठा चर्चेचा विषय ठरला असून सांगली तासगाव येथील व्यस्ततेने त्यांना उपस्थित राहता आले नसले तरी आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
उपमुख्य अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणा, कोपरखळी तसेच त्यांच्या भाषणात विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यावर काय बोलणार याची उत्सुकता असल्याने अनेक जन