सणसवाडी येथील भैरवनाथ महाराजांचा घेतला आशिर्वाद
सणसवाडी (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब दादा पवार घोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज पवार यांचा सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त चेअरमन ऋषिराज पवार यांनी सणसवाडी येथील भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांनी चेअरमन ऋषिराज पवार यांच्यावर शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन सिटीचे माजी सदस्य पंडित दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे जिल्हा उपाध्यक्ष माऊली आबा थेऊरकर उपाध्यक्ष माऊली थेऊरकर, वि. वि. स. सोसायटी धानोरे दरेकरवाडीचे चेअरमन बापूसाहेब भोसरे, सणसवाडी माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर ,उद्योजक प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, किंबर्ली क्लार्क उपाध्यक्ष सणसवाडी सुखदेव दरेकर,उत्तम साठे, उद्योजक दत्तात्रय शेळके, रामभाऊ दरेकर माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम दरेकर, विठ्ठल दरेकर, प्रदिप म्हेत्रे ,रोहित शेळके, अशोक करडे, प्रा.अनिल गोटे सोमेश्वर पाटील, प्रकाश जाधव, व अन्य मान्यवर उपस्थित होते