बाळूमामा , आई जगदंबे तुमच्या भंडार कुंकवाने आमचा मळवट भरला तसा आमच्या किरणच्या कपाळाला विजयाचा गुलाल लागू दे या लेकराची आई स्वप्ने पूर्ण कर
पेरणे फाटा (ता. हवेली): काशी-अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेच्या अभूतपूर्व यशानंतर प्रदीपदादा कंद युवा मंच आणि पै. किरण साकोरे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील यात्रेलाही भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पै. किरण साकोरे यांच्या पुढाकाराने आयोजित या यात्रेत आदमापूरचे बाळूमामा, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले.या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांनी किरण साकोरे यांच्यावर भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.

किरण साकोरे यांच्या विजयाच्या गुलालसाठी आई जगदंबेकडे साकडे : यात्रेदरम्यान बाळूमामाच्या भंडाऱ्याने आणि आई जगदंबेच्या कुंकवाने मळवट भरलेल्या भाविकांनी हात जोडून साकडे घातले.”आई जगदंबे, बाळूमामा, स्वामी तुम्ही आता किरण साकोरेंच्या कपाळाला विजयाचा गुलाल लावा, आमच्या किरणची स्वप्ने पूर्ण करा! आमच्या सेवेसाठी झटणाऱ्या या लेकराला आई यश दे, त्याच्या विजयाचा डंका वाजू दे!”

‘मुलासारखी सेवा’ – माऊलींचा आशीर्वाद किरण साकोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रेदरम्यान काटेकोर व्यवस्थापन ठेवले. आरामदायी बसची व्यवस्था, चहा, नाष्टा, जेवण, देवदर्शन आणि ठेवलेल्या लोकप्रिय कार्यक्रमाने भक्तांचे मन जिंकले. अनेक माता-भगिनींनी भावना व्यक्त करताना सांगितले की, ” किरण साकोरे यांनी मुलासारखी सेवा केली; म्हणूनच आमचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी आहे.”

‘सेवा, समर्पण, विकास’ या कार्यपद्धतीमुळे किरण साकोरे यांनी जनतेच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या प्रत्येक यात्रेला भाविक उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून, त्यांच्याविषयी सर्वसामान्य जनतेला आपुलकी आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.
