काशी अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद कोरेगाव मूळ गटातील भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रस्थान
हडपसर (ता. हवेली), दि. २२ नोव्हेंबर , सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “हर हर महादेव” आणि “जय श्रीराम”च्या गर्जनांनी हडपसर रेल्वे स्थानक भक्तिरसात न्हाऊन निघाले. दुपारी १२.३० वाजता यात्रेला केसनंद गावचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे , माजी सरपंच संतोष हरगुडे यांच्यासह मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवत भव्य प्रस्थान करण्यात आले.

यावेळी यावेळी माजी कृषी उत्पन्न समितीच्या माजी उपसभापती सारिका मिलिंद हरगुडे, माजी सरपंच तानाजी हरगुडे, माजी सरपंच प्रमोद हरगुडे, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष राजेंद्र सावंत, माजी ग्राम पंचायत सदस्य वाल्मीक हरगुडे, उद्योजक शिवाजी हरगुडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील, वारकरी विचारांच्या, सर्वांना सोबत घेऊन काम करणारे व गोरगरीब जनतेची निस्वार्थ सेवा करत विकासाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोचवणारे, विविध सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत सामाजिक बांधिलकी जपणारे राजकारणात समाज कारणाची नाळ जपत सर्वसामान्य माणसाच्या हिताचा व विकासाचा ध्यास असणारे प्रगतशील शेतकरी व उद्योजक रमेश हरगुडे व ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्यासह सर्व सहकारी, मार्गदर्शकांच्या माध्यमातून केसनंद गावचा विकासाचा आलेख उंचावत राहिला आहे.
केसनंद ग्राम पंचायत सदस्या व कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखा रमेश हरगुडे यांनी समाजसेवेचा वारसा जपला असून समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून जिव्हाळ्याचे व माणुसकीचे नाते निर्माण केले असून यामाध्यमातून त्यांनी हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी एकत्र आणत भक्तीसेवेचा अद्वितीय आदर्श निर्माण करत केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील भाविकांना काशी विश्वेश्वराचे व अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला मायबाप भाविक भक्तांनी उदंड प्रतिसाद दिला असून हडपसर येथील रेल्वे स्थानकावरून कशी अयोध्या देवदर्शन यात्रा रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत मोठ्या भक्ती भावाच्या व उत्साहाच्या वातावरणात प्रस्थान करण्यात आले.
जनतेच्या आशीर्वादानेच कार्याला बळ” — “सेवाभावी वृत्ती असलेल्या सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे यांना केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळेल, त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून त्यांना समाजाच्या मूलभूत गरजा व समस्या यांची जाण असून त्या सोडवण्याची व सर्वसामान्य गोरगरीब जनतेची निस्वार्थ सेवा करण्याची सेवाभावी वृत्ती आहे. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी खूप विश्वास असून जनता त्यांच्या राजकीय स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी भरभरून आशीर्वाद देतील असा विश्वास असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

सुसज्ज नियोजन, आयोजन व आरोग्यव्यवस्था – रमेश ( बापू) हरगुडे मित्र परिवार, केसनंद ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या तीर्थ यात्रेचे अचूक व उत्तम नियोजन करण्यात आले असून भाविकांना चहा,नाष्टा, दूध, बिस्किटे, शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदतीसाठी. डॉक्टरांचे व मदतनिसांचे पथक, शेकडो स्वयंसेवक, सुरक्षा रक्षक आणि मिलिंद (नाना) मित्रपरिवार, रमेश (बापू) हरगुडे सर्व कुटुंबीय व मित्र परिवार, केसनंद ग्राम विकास प्रतिष्ठान कार्यकर्ते यांच्या श्रमदानातून नियोजनपूर्वक आनंदात प्रवास ,मुक्काम व दर्शन यात्रा प्रवास आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात सुरू करण्यात आला.
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती : या वेळी केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील विविध गावांचे सरपंच-उपसरपंच, आजी-माजी सदस्य, संस्थांचे पदाधिकारी, तसेच हजारो यात्रेकरू उपस्थित होते.
हर हर महादेव, जय श्री राम, जयघोषात निनादले हडपसर स्टेशन – “हर हर महादेव!”, “जय श्रीराम!!” या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील गावांतून आलेल्या भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. अनेकांनी ही यात्रा “जीवनातील अविस्मरणीय आध्यात्मिक क्षण” असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी एका आजीबाईंनी जात्यावरच्या ओव्यांमध्ये,” “पहिली माझी ओवी ग पंढरीच्या विठ्ठला,सुखी ठेव माझ्या रमेश बापूला…”,“दुसरी माझी ओवी ग तुळजापूरच्या अंबाबाईला,सुखी ठेव माझ्या सुरेखा ताईला…”,“तिसरी माझी ओवी ग जेजुरीच्या खंडोबाला,गुलाल उधळू दे माझ्या सुरेखाताई, संतोष बापूला…” अशा ओव्या गात सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे (एस. पी) यांच्या राजकीय स्वप्नांची पूर्तता देवा तुम्ही करा..आमची सोबत त्यांना मिळणार आहे असे गायनाने मनातील भाव व्यक्त केले.
यावेळी महिला भगिनींनी अभंग, भजन, गवळणी गायल्या जात्यावरील गाण्यामध्ये मिलिंद नाना हरगुडे, रमेश बापू हरगुडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे यांच्या मागे पांडुरंगा, महादेवा, भगवंता प्रभू श्री राम तुम्ही उभे रहा आम्ही त्यांच्या सोबत आहोतच पण तुमचा आशीर्वाद आणि आमची साथ त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एकत्र असू दे असे जात्याच्या, ग्रामीण गायनात म्हटल्याने वातावरणात उत्साह व आनंद संचारला होता.
