सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचे पै. किरण साकोरे यांचे काम कौतुकास्पद  : रविंद्र नारायण कंद 

Swarajyatimesnews

प्रदिपदादा कंद युवा मंच व पै. किरण साकोरे मित्र परिवार आयोजित किरण साकोरे यांच्या नेतृत्वाखालील दिक्षाभूमी यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 एकता, सामाजिक सलोखा जपणारी सर्व समाजांना जोडणारी दिक्षाभूमीकडे  प्रेरणादायी यात्रा

लोणीकंद (ता. हवेली), दिनांक २२ नोव्हेंबर काशी–अयोध्या यात्रेनंतर आता नागपूर येथील पवित्र दिक्षाभूमी अभिवादन यात्रेचे आयोजन करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचे पै. किरण साकोरे यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रविंद्र नारायण कंद यांनी  पेरणे फाटा येथून नागपूर येथील दिक्षाभूमीस मानवंदना देण्यासाठी  रवाना होताना यात्रेच्या शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित आंबेडकर अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

ही यात्रा २१ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता पेरणे येथील गोल्डन पॅलेस समोरील प्रस्थानबिंदूपासून रवाना झाली. भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, बुद्धवंदना आणि पुष्पहार अर्पण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. प्रदिपदादा कंद युवा मंच व पै. किरण शेठ साकोरे यांच्या माध्यमातून लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व समाजबांधवांना एकत्रित घेऊन ही यात्रा पेरणे फाटा येथून प्रस्थान करण्यात आले.

पै. किरण साकोरे हे विविध जाती-धर्मांना एकत्र आणून सौहार्दाची भावना दृढ करणारे नेतृत्व आहे. विविध समाजांच्या धार्मिक व तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी लोणीकंद पेरणे गटातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. नागपूर दिक्षाभूमी यात्रेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करताना पुणे-हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक रविंद्र नारायण कंद यांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी योजनेतील नियोजनबद्धता, शिस्त व व्यवस्थेचे विशेष कौतुक केले.

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील आंबेडकर अनुयायांसाठी प्रदिपदादा कंद युवा मंच व पै. किरण साकोरे मित्र परिवार यांच्या वतीने यात्रेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. यात्रेकरूंकरिता ट्रॅव्हल बसेसची उत्तम सोय, भोजन-निवास आणि संपूर्ण व्यवस्थापन दक्षतेने पार पाडण्यात आले.

ही यात्रा आमदार ज्ञानेश्वर कटके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडी प्रदेश अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, यशवंत साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व संचालक रविंद्र कंद, जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर, हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी कापरे व इतर ज्येष्ठ नेते यांच्या प्रेरणेने करण्यात आली आहे.

 “प्रदिप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली पै. किरण साकोरे यांनी यात्रेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध केले आहे. नागपूर दिक्षाभूमीचे दर्शन घेण्यासाठी गटातील सर्व आंबेडकर बांधवांना संधी उपलब्ध झाली. काशी-अयोध्या यात्रेतही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाधान व्यक्त केले होते. त्याच पद्धतीने दिक्षाभूमी यात्रा देखील सफल आणि आनंददायी ठरेल,”  असा विश्वास फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर यांनी व्यक्त केला.   

यावेळी माजी सरपंच श्रीकांत कंद, सोनाली किरण साकोरे , लोणीकंदच्या उपसरपंच सोनाली श्रीकांत जगताप, माजी सरपंच सुनील वागस्कर,  माजी सरपंच राजेंद्र खुळे, माजी सरपंच कांताराम वागस्कर,  माजी ग्राम पंचायत सदस्य सागर  झुरुंगे, ग्रामपंचायत सदस्य जय कंद, चेअरमन राजाराम साकोरे,माजी उपसरपंच कांतीलाल साकोरे, माजी उपसरपंच सोहम शिंदे, माजी उपसरपंच नंदू  कंद, माजी उपसरपंच सुधीर कंद, विजू साकोरे, ग्रामपंचायत सदस्य सागर बबन कंद, माजी ग्राम पंचायत सदस्य रुपेश शिवाजी गावडे, निलेश गायकवाड, शामराव खलसे, सरपंच अशोक भोरडे, संतोष कंचे, माजी सरपंच सतिश थिटे, माजी उपसरपंच दिनेश वाळके,माजी उपसरपंच अतुल मगर, विद्यमान सरपंच मोनिका श्रीकांत कंद, ग्राम पंचायत सदस्य कावेरी कंद, सामाजिक कार्यकर्ते विजय वाळुंज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!