अल्लाने मोदींमार्फत सगळं दिलंय, मला कुणाची मदत नको! अपंग मुस्लिम व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Swarajyatimesnews

सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे मी कष्टाचंच खाईन.” हे ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत त्याच्या अदम्य आत्मविश्वासाला सलाम केला.

अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर हेमा शर्मा ही नेहमीच गरजू, वंचित आणि पीडित लोकांना मदतकार्य करत असते. तिच्या एका मदतकार्यादरम्यान ही हृदयस्पर्शी घटना घडली. एका गरीब वस्तीत मदत वाटप सुरू असताना, तिथे एक टोपी घातलेला, सायकल गाडा चालवणारा मुस्लिम व्यक्ती येतो. हेमा त्याला मदत देऊ करते, पण तो ती नाकारून पुढे निघून जातो.

https://www.facebook.com/share/r/1EXrcGTDvV/

हेमा शर्मा पुन्हा त्याच्याकडे जाते आणि त्याच्याशी संवाद साधते. ती त्याला विचारते, “तुम्ही आमच्याकडून मदत का घेत नाहीत?” त्यावर तो व्यक्ती अत्यंत स्पष्टपणे सांगतो, “आम्ही मेहनतीचं खातो, कुणाचं घेत नाहीत. मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे मी कष्टाचंच खाईन.”

हेमा त्याच्या स्वाभिमानाने भारावून जाते. ती त्याला भावनिक आवाहन करते, “मी तुमची बहीण आहे… बहिणीचा मान ठेवणार नाहीत का? हे माझं प्रेम आहे.” यावर तो व्यक्ती थोडा विरघळतो, पण आपल्या निश्चयावर ठाम राहतो. तो म्हणतो, “मदत नको… तुम्ही एवढं म्हणालात तेच खूप झालं.” हेमा त्याला पैसे देऊ करते, तेव्हाही तो नम्रपणे नकार देतो आणि म्हणतो, “तुमचे आशीर्वाद आहेत… मी खाणार तर मेहनत करूनच.”

एक साधा माणूस, असाधारण संदेश –  या अपंग मुस्लिम व्यक्तीने केवळ मदत नाकारली नाही, तर त्याने आपल्या कष्टमय जीवनातून एक असाधारण संदेश दिला आहे. हा संदेश आहे स्वावलंबनाचा, आत्मसन्मानाचा आणि श्रमाचे मोल जाणण्याचा. कोणत्याही परिस्थितीत, शारीरिक मर्यादा असूनही, दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर जगण्याची त्याची जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे.

त्याने ‘मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय’ हे विधान करून सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ आपल्याला मिळत असल्याचेही सूचित केले, जे त्याच्या आत्मनिर्भरतेच्या भावनेला आणखी बळ देते. हा व्हिडीओ दाखवून देतो की, मदतीपेक्षा स्वाभिमान आणि स्वतःच्या कष्टावरचा विश्वास किती मोलाचा असतो. एका सामान्य माणसाने आपल्या कृतीतून आणि शब्दांतून माणुसकी आणि स्वाभिमानाचे हे सर्वोच्च उदाहरण सादर केले आहे, जे खऱ्या अर्थाने गौरवास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!