एका गटातील एकाने अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दुसऱ्या गटातील दोघांना मारहाण केली. लोणीकंद पोलिसांनी १२ तासात मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली.ओंकार अंकुश लांडगे (वय-२५ वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली), गणेश संजय चौधरी (वय-२९ वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजित महादेव जाधव यांनी फिर्याद दिली.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सूत्रे फिरवून १२ तासाच्या आत दोघांना अटक केली. लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. लोणीकंद पोलीस पुढील तपास करीत आहेत.