२५ फेब्रुवारी २०२५
वाघोली (ता.हवेली)भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी ३३स्वयंसेवकांनी रक्तदान करत सामाजिक उत्तरदायित्व व बांधिलकी जपली.
या शिबिरासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय, औंध यांच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान संकलन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयाच्या ३३ NSS स्वयंसेवकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाच्या आयोजनात NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वाती कोलट, प्राध्यापक अंगद साखरे आणि प्राध्यापक चक्रधर शेळके यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या रक्तदान शिबिराद्वारे एकूण ३३ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या, ज्यामुळे अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळणार आहे. महाविद्यालयाच्या सामाजिक जाणिवेच्या उपक्रमाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.
“रक्तदान हेच जीवनदान!” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही अशाच शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला.