आबादी कलमुला (ता.पूर्णा) येथे प्लॉट नावावर करुन का देत नाही? या कारणावरून संतापलेल्या मुलाने डोक्यात लोखंडी सबल-पहार हाणून वडिलांचा निर्घृण खून केला.ही घटना बुधवारी (दि.२२) पावणेसहा वाजता घडली. शेख अकबर शेख आमीन असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर शेख आमीन शेख पीर अहेमद (वय ६५) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कलमुला येथे संशयित शेख अकबर शेख आमीन याने बुधवारी नवी आबादी कलमुला येथील प्लॉट माझ्या नावावर करुन दे म्हणून वाद घातला. यावेळी त्यांने शेख आमीन शेख पीर अहेमद यांच्या डोक्यात लोखंडी सबल (पहार) हाणून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर मुलगा पसार झाला होता.
दरम्यान, घटनास्थळी चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि पोमनाळकर, कच्छवे, राठोड, आईटवार, तोंडेवाड, मिटके यांनी धाव घेतली. गंभीर जखमी वडिलांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच चुडावा पोलीस ठाण्यात फिर्याद देणारे शेख अफसर शेख रशीद (वय ३५, रा. कलमुला) यांनाही संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी संशयित शेख अकबर शेख आमीन याच्या विरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर करत आहेत.