बांधकाम विभागाच्या निषेधार्थ पिंपळे जगताप ग्रामस्थ आक्रमक, रस्ता रोको करत तीव्र निषेध, एका महिन्यात चार बळी 

Searajyatimesnews

गावची जत्रा रद्द करण्याचा निर्णय, ग्रामस्थ खेडकर कुटुंबाला घरटी करणार आर्थिक मदत

शिक्रापूर : चाकण – शिक्रापूर रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या  पिता आणि पुत्राचा अपघातात जागेवर मृत्यू झाला होता.  या घटनेमुळे पिंपळे जगताप गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होत शोकसभा घेऊन बांधकाम विभागाचा तीव्र निषेध व्यक्त केला.पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील कालच्या खेडकर परिवारातील तिघांसह शाळेत जाण्याच्या प्रवासात महिनाभरात चौघांचे मृत्यू झाल्याने संपूर्ण गावकरी संतप्त आहेत. शिक्रापूर-चाकण रस्त्याला दुभाजक नाहीत, गतिरोधकांबाबत निश्चित धोरण नाही, आवश्यक परावर्तक आणि सूचना फलक नसल्याने हे चारही बळी प्रशासकीय दुर्लक्षाचे आणि रस्ते उभारणाऱ्या बांधकाम खात्याचे आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची तत्काळ पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आज ग्रामस्थांच्या रास्तारोकोवेळी आंदोलनात ग्रामस्थांनी गावची जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

खेडकर परिवारासाठी गावाचा आर्थिक पुढाकार  – संपूर्ण घराचा आधार व भविष्य कालच्या अपघातात निवर्तल्याने संपूर्ण गावाने खेडकर परिवाराला आर्थिक मदत करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला असून, यासाठी एक गुगल पे नंबर व स्कॅनर सर्वांच्या मोबाईलवर यावेळी देण्यात आला. याबाबत घरटी मदत देण्याची भूमिका युवकांनी जाहीर केली व त्यानुसार पैसेही गोळा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती सरपंच सोनल नाईकनवरे यांनी दिली.

सोमवारी सकाळ चाकण – शिक्रापूर रस्त्यावरून एका मद्यधुंद ट्रक चालकाने ओव्हरटेक करताना समोरच्या दुचाकीवरून चाललेल्या वडिल आणि मुलांना चिरडेल यात त्या तिघांचा जागेवरच मृत्यू  झाला होता. ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत शोकसभा घेत रास्ता रोको केला.  या आंदोलनात गावच्या सरपंच सोनाल अशोक नाईकनवरे, पोलीस पाटील वर्षा थिटे, भगवान शेळके, सागर शितोळे,  अशोक जगताप, ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी रमेश टाकळकर,  चंदन सोंडेकर, अशोक शेळके, सागर शितोळे, महेश जगताप, ज्ञानेश्वर शितोळे अक्षय सोंडेकर, स्वप्नील शेळके, रामदास सोंडेकर, शिवाजी जगताप, नीलेश फडतरे, सविता थिटे, स्वाती वळसे, मनीषा तांबे, माजी उपसरपंच रेश्मा कुसेकर, निर्मला दौंडकर, स्वाती वळसे, मनीषा तांबे,  आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.  तसेच या झालेल्या दुर्देवी घटनेमूळे यंदाची गावची जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी स्थानिक लोकसप्रतिनिधिकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!