शिक्रापूर (ता. शिरूर) येथील विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम राबवणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व भीम अनुयायांना विशेषतः लहान मुले व स्त्रियांसाठी पुरी भाजी व मोफत पाणी बॉटलचे मोफत वाटप करण्यात आल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषा रमेश गडदे यांनी सांगितले.
शिक्रापूर मधील मलठण फाटा येथील जीत हॉटेल समोरील पार्किंगमध्ये सकाळी ८.३० वाजल्यापासून विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी भारतभरासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी आले होते यावेळी त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, लहान मुले, गर्भवती स्त्रिया, माता भगिनी व अनुयायी,वृद्ध, नागरिक यांच्या सेवेसाठी कर्तव्य फाऊंडेशन यांच्या वतीने पुरीभाजी व पाणी बॉटल यांचे मोफत वाटप करण्यात येऊन माणुसकी धर्माचे पालन करत समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व आपुलकी जपली आहे.
शिरुर तालुका आर. पी.आय. गटाचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्रापूर ग्रामनगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, संस्थेचे सचिव संतोष काळे,संचालक अंकुश घारे, ज्येष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड, महंमद तांबोळी,जितेंद्र काळोखे, महेश शिर्के, सत्यवान भुजबळ, भानुदास राऊत, मेघा तांबे, वैशाली गायकवाड, वंदना रामगुडे,भरत खोले, संकेत गडदे, पत्रकार निलेश जगताप, हार्दिक गडदे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्तव्य फाऊंडेशन म्हटले की माणुसकी जपणारी, सामाजिक बांधिलकी व आपुलकी जपत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करणारी, गरजवंताच्या हाकेला धावणारी व दुःखी,पीडित ,उपेक्षित ,वंचितांच्या दुःखावर मायेची फुंकर घालत त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्याला मदत करत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारी सेवाभावी फाऊंडेशन असल्याचे व आपल्या सामाजिक कार्यातून ते दाखवून देणार. – संस्थापक, अध्यक्षा मनिषा रमेश गडदे , कर्तव्य फाऊंडेशन