पुणे – दिनांक ७ डिसेंबर कर्नाटक येथील बंगळूर शहरात भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने पुरुष फ्रीस्टाईल, ग्रिकोरोमन व महीला वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दीनांक ५ ते ८ डींसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ग्रिकोरोमन कुस्ती विभागात महाराष्ट्र कुस्ती संघाचा पै. दिग्विजय भोंडवे याने १३० कीलो वजनगटात छत्तीसगड , राजस्थान, कर्नाटक व पंजाब येथील कुस्तीगीरांवर नेत्रदीपक विजय मिळवत रौप्यपदक पटकावले.
पै. दिग्विजय हा लोणीकंद पुणे येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात सराव करत असुन एन.आय.एस कुस्ती कोच पै.सुरज तोमर व पै.संतोष यादव यांचे त्यास कुस्ती मार्गदर्शन मिळत आहे . महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजपा क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष पै.संदीप भोंडवे हे दिग्विजय चे वडील आहेत .
पै.दिग्विजय भोंडवेचे केंद्रीय मंत्री पै.मुरलीधर मोहोळ , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस व सरचिटणीस पै.योगेश दोडके खजिनदार श्री संजय शेटे उपाध्यक्ष पै. विलास कथोरे व पै. संजय तिरथकर तसेच जाणता राजा कुस्ती केंद्राचे अध्यक्ष पै.सचिन पलांडे यांनी अभिनंदन केले …