पुण्यात शेतकऱ्याने भात शेतात साकारली १२० फूट विठुरायाची प्रतिकृत
पुणे – पंढरपूरची पायी वारी अवघ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा असतो.विठुरायाच्या दर्शनासाठी तहानभूक हरून वारकरी विठुरायाच्या नामात दंग होत नाचत, गात बागडत आनंदाने ज्ञानोबा माऊली तुकाराम मुखी गट पायी वारीला जात असतो.
तसेच काहीजण कांदा, मुळा,भाजी अवघी विठाबाई माझी म्हणू शेतातील भात पिकात विठुरायाला प्रतिकृती स्वरूपात साकारत त्याच्या चरणी नतमस्तक होतात.असेच उदाहरण एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर दिसत असून पुण्यातील एका इंजिनिअरने यावर मार्ग काढला. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका विठ्ठल भक्ताचा व्हिडिओ समोर आला आहे. या शेतकऱ्याने केलेल्या कृतीचं सर्वांनीच तोंड भरून कौतुक केलं आहे. ढ
पंढरीची वारी मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभमान आहे. आज आषाढी एकादशीच्या पर्वावर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातून येणाऱ्या वैष्णावांचा मेळा पंढरपुरला भरतो. लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्या भाविकांना विठुरायाचं दर्शन लाभतं ते भाग्यवानच! पण ज्यांना पंढरपूर गाठता येत नाही त्यांनी काय करावं बरं? असा प्रश्न निर्माण होतो पण भाविक आपल्या कामातून ते व्यक्त करत विठूरायाशी एकरूप होतात.
आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क विठुरायाची प्रतिकृती बनवली आहे. पुण्याच्या मुळशी गावातील या शेतकऱ्याने आपल्या शेतात भातरोपाची १२० फूट उंच विठ्ठलाची प्रतिकृती साकारल्याचं पाहायला मिळत आहे. पेश्याने इंजिनिअर असणाऱ्या शेतकऱ्याची कलाकृती नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये या शेतकऱ्यासह गावातील काही ग्रामस्थ विठुरायाचं दर्शन घेताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये भातरुपी विठ्ठलाची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ गतवर्षीचा असल्याची माहिती मिळत आहे.
All India Radia News च्या एक्स प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भातशेतीच्या बियाण्यापासून विठ्ठलाचं देखणं रूप साकारून मुळशीच्या या शेतकऱ्याने नेटकऱ्याचं लक्ष वेधलं आहे. व्हिडिओवर “जय श्री विठ्ठल जय हरि विठ्ठल” अशी कमेंट एक यूजरने केली आहे तर आणखी एकाने “राम कृष्ण हरी” म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे.