सणसवाडी कचऱ्याच्या विळख्यात; प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
शिक्रापूरचा कचरा सणसवाडीच्या माथी; बेकायदा कचरा डेपो आणि धुराच्या लोटामुळे ग्रामस्थ हैराण सणसवाडी (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या सणसवाडी गावाला आता ‘कचऱ्याचे माहेरघर’ अशी नवी आणि विदारक ओळख मिळू लागली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कचरा सणसवाडीच्या हद्दीत अवैधरित्या आणून टाकला जात असून, दुसरीकडे सणसवाडीत डोंगर वस्ती भागात जाळला जात आहे. या दुहेरी संकटामुळे…
