
सन्मान भूमिपुत्राचा! कोरेगाव भीमाचे सुपुत्र अरविंद गोकुळे झाले अप्पर पोलिस अधीक्षक
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील सुपुत्र आणि गावचे आदर्श अधिकारी अरविंद गोकुळे यांची अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या कार्यतत्परतेने प्रशंसनीय सेवा बजावली असून, गावातील तरुणांसाठी ते नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कष्टाळू मुलाने घेतलेली ही नेत्रदीपक भरारी गावासाठी गौरवाची बाब ठरली…