डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्या वतीने सहकुटुंब सन्मान
शिक्रापूर ( ता.शिरूर) दि.२१मार्च – येथील लोकाभिमुख सेवा देत तातडीने तक्रारींचा ननिपटारा करत, खंडीत विजपूरवठ्याचे अत्यल्प प्रमाण आणि औद्योगिक विजपूरवठ्यासाठी २४ तास सेवा देणारे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना पुणे-नगर महामार्गावरील औद्योगिक कंपन्यांची संघटना डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्या वतीने आदर्श सार्वजनिक सेवा पुरस्कार-२०२४ ने नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आशिषकुमार चव्हाण यांच्या हस्ते पुण्यात सन्मानित करण्यात आले.
महावितरणचा प्रतीमाह वसुल १२५ कोटी एवढा असून त्यातील औद्योगिक वसुल सुमारे ११० कोटी एवढा आहे. एवढ्या आवाढव्य औद्योगिक विजपूरवठ्यातील नियमन, सुसूत्रता आणि अत्यंत कमी विद्यूत खंड गेल्या वर्षभरात राहिल्याने डीसीसीआय ने उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना आदर्श सार्वजनिक सेवा पुरस्कार-२०२४ देवून सपत्निक सन्मानित केले.
महावितरणच्या शिक्रापूर विद्यूत वितरण विभागाचे वतीने रांजणगाव, कोंढापूरी, शिक्रापूर, सणसवाडी, पिंपळे-जगताप तथा या परिसरातील सुमारे ३ हजार ५०० छोट्या-मोठ्या कंपन्यांना औद्योगिक विद्यूतपूरवठा २४ तास केला जातो. त्याबाबतचे संपूर्ण नियंत्रण, नियमन व ग्राहक सेवा नियंत्रण शिक्रापूर येथील महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांचे नियंत्रणाखाली केले जाते.
शिक्रापूर, रांजणगाव, कोरेगाव भीमा, पाबळ, तळेगाव या पाच शाखा कार्यालयांद्वारे चाललेल्या या कारभारात. सदर पुरस्कार वितरण करणारे नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया मुख्य व्यवस्थापक आशिषकुमार चव्हाण यांनी महाजन यांचे कौतुक करताना शासकीय सेवेचा आदर्श शिक्रापूर विभाग असे म्हणत जाहीर कौतुक केले.
कार्यक्रमाला डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे चेअरमन रथिन सिन्हा, उपाध्यक्ष एच पि श्रीवास्तव, सचिव व्हि.एल.मलू, खजिनदार प्रकाश धोका व सर्व सभासद उपस्थित होते.
दरम्यान औद्योगिक क्षेत्राने महावितरणच्या चांगल्या सेवेची दखल घेवून नितीन महाजन यांना पुरस्कार देवून सन्मानित केल्याबद्दल महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, राजेंद्र पवार, अधिक्षक अभियंता दिपक लहामगे, कार्यकारी अभियंता विकास अल्हाट यांनीही नितीन महाजन व पाचही शाखा अभियंत्यांचे यावेळी कौतुक केले.
अविरत काम करण्यासाठीबवेल व प्रेरणा दिल्याने ’माधुरीवहीनीं’ सह मुलांवर कौतुकाचा वर्षाव –
काम करत असताना ऊन,वादळ, वाऱ्यासह भर पावसात, थंडीत वेळी-अवेळी महावितरणची सेवा खंडीत झाल्यास तात्काळ सेवा सुरळीत करण्यात शिक्रापूर उपविभाग अत्यंत तत्पर असल्याचे उपस्थित उद्योजकांनी जाहीर सांगित विभागाचे कौतुक केले. यावेळी नितीन महाजनांचे कौतुक होताना त्यांच्या कुटुंबाची कौटुंबीक साथ असल्यानेच ते उत्तम कामगिरी करु शकल्याचा खास उल्लेख औद्योगिक क्षेत्रातील अनेकांनी केल्याने यावेळी महाजन यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माधुरी, मुले मानस व सोहम यांनाही व्यासपिठावर सन्मानित करण्यात आले.