Category: स्थानिक वार्ता
जय श्री राम नमन तुज दशरथ नंदना, पूर्ण होवो पै.किरण साकोरे यांच्या सर्व मनोकामना
अयोध्येत दर्शनावेळी यात्रेकरूंचे प्रभू श्री रामांकडे साकडे अयोध्या/पुणे:दि.१० नोव्हेंबर लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मायबाप जनतेसाठी प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परीवार यांच्या वतीने काढण्यात आलेल्या काशी – विश्वेश्वर व अयोध्या देवदर्शन यात्रेच्या शेवटी यात्रेकरू भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने पै.किरण साकोरे यांच्या परिवारासोबत अयोध्येत परमेश्वर प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले….
राष्ट्रवादी (अजित पवार) कडून केसनंद गटात जिल्हा परिषदेला सुरेखा हरगुडे तर पं.स.ला संतोष हरगुडे यांची उमेदवारी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून जाहीर
‘हा गट सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार’ आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा विश्वास अष्टापूर (ता.हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने केसनंद-कोरेगाव मूळ पुणे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेची उमेदवारी सुरेखा हरगुडे यांना तर पंचायत समितीची उमेदवारी संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे यांना जाहीर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जाहीर करताच टाळ्यांच्या व घोषणांच्या जल्लोषात उपस्थितांनी उत्स्फूर्त…
Breaking News : प्रकाश धारिवाल यांच्या निवडणूक न लढण्याच्या घोषणेने शिरूरच्या राजकारणात भूकंप!
राजकारणात नाही तर समाजकारणात रस शिरूर (प्रतिनिधी) : शिरूरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घोषणा करत शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा, उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी स्पर्धेत उतरणार नसल्याची घोषणा केली आहे.(Breaking News: Prakash Dhariwal’s announcement not to contest the election causes an earthquake in Shirur politics!) “मला राजकारणात नाही…
गंगा घाटावरील आरतीने किरण साकोरे यांनी भक्तांच्या मनात मिळवले अढळ स्थान
भगवंता आमच्या किरणची सर्व स्वप्ने पूर्ण कर, भाविक भक्तांचा आशीर्वाद किरण साकोरेंच्या पाठीशी गंगेच्या लहरींवर नाचला भक्तीचा प्रकाश, वाराणसीत आत्म्याचा भगवंताशी संवाद!” वाराणसी : ७ नोव्हेंबर,गंगेच्या लहरींवर नाचला भक्तीचा प्रकाश, शंखाचा गगनभेदी स्वर आणि डोळ्यांत दाटून आलेली समाधानाची ओल..लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी पै. किरण साकोरे यांच्या नेतृत्वाखाली माता गंगेच्या आरतीचा आणि काशी विश्वेश्वरांच्या दर्शनाचा…
किरण साकोरेंच्या सेवाभावी यात्रेतून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ
धूप, दीप आणि भक्तीचा महासंगम, वाराणसीतील गंगा आरतीचा पेरणे लोणीकंद गटातील भाविक भक्तांनि घेतला स्वर्गीय अनुभव वाराणसी, ७ नोव्हेंबर : वाराणसीच्या पवित्र घाटावर संध्याकाळचा काळोख उतरू लागला तसा गंगेच्या लहरींवर हजारो दिव्यांचा प्रकाश नाचू लागला. शंखध्वनी, घंटानाद आणि मंत्रोच्चारांच्या गजरात वातावरण पवित्रतेने भारून गेले. त्या दिव्य क्षणी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी पै. किरण साकोरे…
शिक्रापूर-चाकण रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात; संजय पाचंगे यांचे आंदोलन स्थगित
शिक्रापूर प्रतिनिधी – राजाराम गायकवाड शिक्रापूर-चाकण मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांनी नियोजित आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्रापूर-चाकण तसेच कोरेगाव भीमा-शिरूर या रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, खराब साईड पट्ट्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या धोकादायक परिस्थितीमुळे वारंवार अपघात होत असून अनेकांचे…
काशी-अयोध्या यात्रेतून किरण साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभणार – प्रदिप विद्याधर कंद यांचा विश्वास
“जनता जनार्दनाचे प्रेम आणि मायेची शिदोरी घेऊन आम्ही देवाच्या दारी जात आहोत.” – पै. किरण संपत साकोरे पुणे,हडपसर रेल्वे स्थानकावरून देवदर्शन यात्रेचे काशी-अयोध्याकडे भव्य प्रस्थान हडपसर (ता. हवेली) : सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाने हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाणे, ही एक अद्वितीय कामगिरी ठरली आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या पै….
पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला अखेर घातल्या गोळ्या…तीन जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार
डार्ट चुकला… वनरक्षकांवर बिबट्याचा हल्ला … मग शार्प शूटरने घातल्या गोळ्या… शिरूर :शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शेवट झाला आहे. दोन लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेला बळी घेणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते.रविवारी मध्यरात्री, थरारक पाठलागानंतर शार्प शूटरच्या अचूक नेमाने या बिबट्याचा शेवट…
शिरुरमध्ये नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; पिंपरखेड-जांबुत परिसरात शूटर पथक तैनात
शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांत दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य वनसंरक्षकांनी नरभक्षक बिबट्याला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले असून पिंपरखेड आणि जांबुत येथे विशेष शूटर पथक तैनात करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात रोहन…
‘एमपीएससी’ परीक्षेत १६ वेळा अपयश पण.. झाडू कामगार महिलेची लेक अखेर झाली मोठी अधिकारी
“आईच्या झाडूतून उडालेल्या धुळीतून उगवला यशाचा सूर्य!”, संघर्ष, जिद्द आणि मातृछत्राखाली घडलेली प्रेरणादायी कहाणी कोपरगाव – “अपयश कितीही आले तरी प्रयत्न थांबवू नयेत,” हे ब्रीद अंगीकारून जगणाऱ्या एका झाडू कामगार महिलेच्या लेकीने अखेर आपल्या परिश्रमांच्या जोरावर एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवून दाखवले. तब्बल १६ वेळा अपयश पदरी पडलं, तरी हार न मानता घेतलेली झुंज अखेर…
