Category: स्थानिक वार्ता
तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गटात दिपाली राहुल गव्हाणे यांच्या ‘विकासाच्या संकल्पनामाने’झंझावात’
शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास असलेल्या व्हिजनला मतदारांचा भरघोस प्रतिसाद तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट केंद्रस्थानी आला आहे. या गटात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार दिपाली राहुल गव्हाणे यांनी आपल्या नियोजनबद्ध, मुद्देसूद आणि पूर्णतः विकासकेंद्री प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरणच बदलून टाकले आहे. पारंपरिक राजकीय भाषणांऐवजी पुढील पाच वर्षांचा स्पष्ट,…
डिंग्रजवाडी गावाची एकी अन् निष्ठेची ‘वारी’, डिंग्रजवाडी अख्खं गावच करतेय दिपाली गव्हाणेंचा प्रचार घरोघरी…
पुणे जिल्ह्यातील एक असा उमेदवार ज्याचा अख्ख्यच्या अख्ख गावच करतेय प्रचार भाडोत्री कार्यकर्त्यांना फाटा; घरचा डबा, कांदा-भाकरी खाऊन आपल्या ‘सूनबाईंसाठी’ अख्खं गाव मैदानात, सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारा संकल्पनामा भावतोय मतदारांना डिंग्रजवाडी (ता. शिरूर): पुणे जिल्ह्याच्या राजकारणात , दारू, मटण,पंच पक्वान्नाच्या भोजनावळींचे थाट आणि ‘पाकीट’ संस्कृतीचा उच्छादाला उधाण येत असताना, शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी या गावाने निष्ठेचे…
लोणीकंद पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन
पोलीस दलावर शोककळा, ‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराचे मानकरी; शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाला हृदयविकाराचा काळा घाला दिनांक १ फेब्रुवारी लोणीकंद (ता.हवेली) कर्तव्यदक्षता आणि संयमी स्वभावाचा आदर्श असलेले लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत निष्ठेने ड्युटी बजावून घरी परतलेल्या या हसतमुख…
अजित दादांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे रिंग रोडला त्यांचे नाव देण्यात यावे – रवींद्र वाळके
बारामतीच्याबारामतीच्या माळरानावर पडलेली कागदपत्रे अजित दादांच्या कामाची साक्ष देतात तर लाडक्या बहिणींचा हक्काचा दादा हरवला तर राजकारणातील आमचा आधारवड दादा हिरावले आहे – प्रदिप वसंतराव कंद लोणीकंद (ता.हवेली): “घड्याळाच्या काट्यावर चालणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज नियतीच्या काट्याने आमच्यातून हिरावून नेला…” अशा शब्दांत शिरूर-हवेलीतील कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
शिक्रापुरात राष्ट्रभक्तीचा जागर सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते ध्वजारोहण
एकल महिला’ अभियानाची शपथ घेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न शिक्रापूर (ता. शिरूर) शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण ग्रामपंचायत परिसर दुमदुमून गेला होता….
अजित ‘दादां’चा शब्द अन् राष्ट्रवादीची सरशी; मांढरेंची माघार, तर भाजपची मोठी नाचक्की!
शिक्रापूर (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक १८ मध्ये अखेर नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार माऊली कटके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर विद्यमान सदस्य कुसुम आबाराजे मांढरे यांनी बंडाचे निशाण खाली घेत माघार घेतली. मात्र, याच वेळी…
बकोरी परिसरात भाजपचा घरोघरी जाऊन प्रचार व संवादास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बकोरी (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच हवेली तालुक्यातील प्रतिष्ठेच्या लोणीकंद–बकोरी परिसरात भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार पै. किरण संपतराव साकोरे, लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ मधील उमेदवार मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ मधील उमेदवार राणी दत्तात्रय वाळके यांनी…
जनतेचा विश्वास हीच माझी आशीर्वाद रुपी खरी ताकद -पै.किरण साकोरे
भाजपचा बालेकिल्ला राखण्यासाठी पै. किरण साकोरे मैदानात; पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात विकासाचे रणशिंग फुंकले! लोणीकंद (हवेली): पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘हाय व्होल्टेज’ ठरणाऱ्या हवेली तालुक्यातील पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून पै. किरण संपत साकोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. केवळ उमेदवारी अर्ज नव्हे, तर हा…
धक्कादायक! लोणी काळभोर येथे कार अंगावरून गेल्याने पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू
चिमुरड्याच्या रक्ताळलेल्या देहाला कवेत घेताना चालकाचेही हात थरथरले ! लोणी काळभोर (ता.हवेली) आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत ज्या अंगणात तो हसला, बागडला आणि ज्या मातीत त्याने स्वप्नांचे किल्ले रचले, त्याच मातीत नियतीने त्याच्या आयुष्याचा खेळ मांडला. लोणी काळभोर येथील एका सोसायटीच्या आवारात खेळताना पाच वर्षांच्या निष्कर्ष रेड्डी या चिमुरड्याचा गाडीखाली चिरडून अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेने केवळ…
बैलगाडा मालकांची जिवलग यारी… लोणीकंद-पेरणे गटात पै. किरण साकोरेंची बसवणार विजयी बारी!
वढु खुर्द येथे ‘विजयी गुलाल’ उधळण्याचा बैलगाडा प्रेमींचा निर्धार वढू खुर्द (ता. हवेली): लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील राजकीय घाटात आता पै. किरण साकोरे यांचीच बारी बसणार आणि आम्हीच विजयाचा गुलाल उधळणार, असा ठाम निर्धार बैलगाडा मालक, शेतकरी आणि युवकांनी व्यक्त केला आहे. वढु खुर्द येथे संपन्न झालेल्या ‘बैलगाडा मालक संवाद मेळाव्यात’ काळया आईच्या लेकरांसाठी आणि…
