Category: स्थानिक वार्ता
खेड मधील बहुळ येथे घरावर सशस्त्र दरोडा, दोघांना चाकूने भोकसले घराची फरची रक्ताने लाल
पुणे – बहुळ (ता. खेड) येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू व सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. मात्र घरातील संबंधितांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील फरशी रक्ताने माखली होती. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शालन जयराम वाडेकर…
वाघोलीत टँकरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
वाघोली (ता.हवेली) कचरा वेचणाऱ्या राधिका सोनवणे (५२) यांचा शनिवारी सकाळी पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी ७:१५ ते ७:३० च्या दरम्यान केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होमजवळ घडली. याप्रकरणी शरद भाकरे यांनी चालक आणि मालकाविरुद्ध पोलिसात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे राधिका नेहमीप्रमाणे आपल्या कामावर लवकर निघाल्या होत्या आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत…
शिवजयंती निमित्त ‘गडकोट व्याख्यानमाला’ उत्साहात संपन्न
बी जे एस संस्था छत्रपतींच्या स्वराज्य विचारांची पाईक -पांडुरंग बलकवडे दिनांक २० फेब्रुवारी वाघोली ( ता.हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष व शिवजयंती निमित्त बीजेएस महाविद्यालयातील इतिहास विभाग अंतर्गत हिंदवी स्वराज्याच्या राजधानीची माहिती होण्यासाठी गडकोट वारसा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बीजेस प्रबंध समितीचे अध्यक्ष अरुणजी नहार, महाविद्यालय विकास…
रस्त्यामध्ये चारचाकी गाडी उभी, वादातून महिलेसह पतीला मारहाण, दगड मारला फेकून
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रस्त्यामध्ये चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला, सासू आणि सासरे यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता घडली. याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या…
बी जे एस महाविद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा
३०६ खेळाडूंनी घेतला उस्फूर्तपणे सहभाग वाघोली (ता. हवेली) : भारतीय जैन संघटनेच्या बी जे एस महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ हा प्रचंड उत्साहात पार पडला. यावर्षी महाविद्यालयीन प्रांगणात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये ३०६ खेळाडूंनी सहभाग नोंदवून क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशस्वी सहभागामुळे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड व क्रीडा शिक्षक डॉ. रमेश गायकवाड यांनी त्यांना अभिनंदन…
धक्कादायक! वाघोलीत चापट मारल्याच्या रागातून कंटेनर चालकाने दुसऱ्याला चाकाखाली चीरडल्याने जागीच मृत्यू
हॉटेलमधील बिल देण्याचा वाद बेतला जीवावर वाघोली (ता.हवेली) येथे कटकेवाडी परिसरात एका किरकोळ वादातून कंटेनर चालकाने दुसऱ्या चालकाला थेट कंटेनरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधील बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने राग मनात ठेवून आपला सहकारी चालकाला कंटेनरखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केलिव आर्थिक मदत
माझी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ३२ लाखांच्या कर्जाची रक्कम कुटुंबियांकडे सुपूर्त देहू – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी नुकतीच आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज होतं. कर्जाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेला चिठ्ठीत केला होता. ३२ लाखाच्या कर्जाची रक्कम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्या…
शिरुर प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकूनाला लाच स्वीकारताना अटक
धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून एक लाख साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.सुजाता मनोहर बडदे असे लाच स्वीकारणाऱ्या महिला अव्वल कारकूनाचे नाव आहे. त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तानाजी श्रीपती मारणे यांनी लाच स्विकारली होती. त्यामुळे खाजगी इसम मारणे व अव्वल कारकून सुजाता बडदे…
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात तरुणाने पत्नी व मुलांसमोर घेतली झाडाला फाशी
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात कौटुंबिक वादातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ८) सायंकाळी घडली. सोहेल येनघुरे (वय २८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल आणि त्याच्या पत्नीचे किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. शनिवारी घरगुती भांडणानंतर सोहेलने पत्नीला घटस्फोटाची धमकी दिली. त्यानंतर पत्नी आणि दोन मुलांसोबत ते शिवाजीनगर…
धक्कादायक ! आळंदीत सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू
आळंदीतील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गावात पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या स्वामी यांना सापाने दंश केला. दंशानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू…
