State Level Nalanda Pride Award :राज्यस्तरीय पुरस्काराने सणसवाडीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
https://swarajyatimesnews.com/राज्यस्तरीय-नालंदा-गौरव/225/
सणसवाडी (ता.शिरूर) येथील माजी सरपंच व पुणे जिल्हा सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा सुनंदा नवनाथ दरेकर यांना राजकीय व कोरोणा काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दाखल घेत राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२४ यांच्या वतीने आदर्श सरपंच म्हणून गौरविण्यात आले.
State Level Nalanda Pride Award :उद्योगनगरी सणसवाडी येथील माजी सरपंच व सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुनंदा नवनाथ दरेकर यांनी केलेल्या राजकीय व कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याची दाखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कृषी उपसंचालक ॲड दिनकर कानडे, ए आर जे उद्योगसमूहाचे जितेंद्र दाते व नालंदा ऑर्गनायझेशन चे संस्थापक श्रीकांत जायभाय यांच्या हस्ते देण्यात आला.
राजकीय व कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२४ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे पुणे पत्रकार संघ येथे आयोजन करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे .
या पुरस्कार वितरण सोहळ्यात आरोग्य,शिक्षण,कला, सामाजिक,राजकीय, उद्योग,कृषी, क्रीडा,अध्यात्म,पत्रकार,युवा महिला, आदर्श ग्रामपंचायत या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते.
वारकरी संप्रदायाच्या विचारांवर वाटचाल करत जनतेची सेवा ईश्वर मानून केली. याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने गावचा नावलौकिक वाढला यामुळे मनापासून आनंद आहे.हा पुरस्कार ग्रामस्थ, सर्व नागरिकांना व मार्गदर्शक यांना समर्पित करत आहे.
-
माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर