आमदार अशोक पवारांच्या सभेपूर्वी निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना डांबून ठेवले पोलीस चौकीत.

स्वराज्य टाईम्स न्यूज

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने व पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ॲड.अशोक पवार पोलीस बळाचा वापर करतात शेतकऱ्यांचा आरोप

ळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या प्रचार सभेच्या अगोदर निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकरी पुत्रांना आमदार अशोक पवार यांनी पोलीस बळाचा वापर करत सभा संपेपर्यंत शेतकऱ्यांना पोलीस चौकीत डांबून ठेवल्याने आमदार अशोक पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत असून समाज माध्यमांमध्ये टीका होत असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसत असून पराभव समोर दिसू लागल्याने आमदार अशोक पवार चुकीचे असंविधानिक वागत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न टाळण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत शेतकरी मुलांना थेट पोलिस ठाण्यात डांबून ठेवण्याची घटना आमदार अशोक पवारांच्या प्रचार सभेत घडली आहे.

तळेगाव ढमढेरे येथे झालेल्या सभेआधी काही शेतकऱ्यांनी अशोक पवारांच्या विरोधात निषेध फलक झळकवल्याने पोलिसांनी त्यांना थेट चौकीत बसवले. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचल्याची टीका अशोक पवारांवर केली जात आहे.

शेतकऱ्यांनी झळकावले निषेधाचे बॅनर – आमदार अशोक पवार यांच्या प्रचार दौऱ्याची सभा तळेगाव ढमढेरे येथे होत असताना काही शेतकऱ्यांनी कर्ज सम्राटांच्या करामती…शेळी बाजार गावातून बाहेर काढत बारा बलुते दारांच्या पोटावर पाय देणाऱ्याला मतदान करायचे का ?, ज्यांनी घोड गंगा कारखाना बंद पाडला त्यांना मतदान करायचे का?, पुनर्वसन शेरा कमी करण्याचे हजार दाखवून दोन वेळा आमदार झाला परत आमदार करायचा का ? , आजोबा गेले ,वडील गेले वारसनोंद नाही स्वतःचा मुलगा सभासद होऊन चेअरमन होतो कसा ?, अशा आशयाचे फलक झळकवल्याने आमदार अशोक पवार यांनी पोलीस बळाचा चुकीचा वापर करत आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सभा होईपर्यंत डांबून ठेवल्याचे शेतकरी मार्तंड ढमढेरे, सुनील ढमढेरे ,रामभाऊ जगताप, सुधीर ढमढेरे ,विजय घुले, राजू पाटील ढमढेरे, सचिन गुंदेचा,सुधीर ढमढेरे, प्रफुल्ल आल्हाट, दिलीप खैरे यांनी म्हटले आहे.

“शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारही नाही का?” – सभेत शेतकऱ्यांनी दाखवलेले फलक व त्यांच्या समस्यांवर आणि घोडगंगा साखर कारखान्याच्या बंदीवर आधारित होते. “कर्ज सम्राटांच्या करामती,” “घोडगंगा बंद पाडणाऱ्याला मतदान?” आणि “शेतकऱ्यांच्या जिवावर पोसणाऱ्यांचे खरे रंग ओळखा” अशा फलकांद्वारे शेतकऱ्यांनी विरोध व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी त्यांना सभा संपेपर्यंत चौकीत ठेवले, ज्यामुळे आमदार पवारांची हुकूमशाही पद्धती दिसून आली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पराभवाचा धसका घेतला? – शेतकऱ्यांचा आरोप – शेतकऱ्यांच्या मते, अशोक पवारांना आगामी निवडणुकीत पराभवाचा अंदाज येत असून, त्यामुळेच त्यांनी पोलिस बळाचा वापर करत शेतकऱ्यांचा आवाज दाबत सत्य परिस्थितीला सामोरे न जाता पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. घोडगंगा साखर कारखान्याचा प्रश्न आणि पोलीस बळाचा वापर -घोडगंगा साखर कारखाना अजूनही बंद आहे आणि शेतकऱ्यांना रात्र रात्र झोप येत नसून ऊस घालायचा कुठे, मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाह व कुटुंबाचे पालनपोषण करायचे कसे तसेच कामगारांच्या पगाराचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. दिवाळीच्या सणातही पैसे व साखर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत लोकशाही पद्धतीने निषेध व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांना चौकीत डांबून ठेवणे हे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. “

लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न” -शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशोक पवारांची हुकूमशाही असून लोकशाहीमध्ये नेत्याला प्रश्न विचारण्याचा व उत्तरे मागण्याचा अधिकाराची पायमल्ली होत असून लोकशाहीचा गळा घोटवण्याचे काम अशोक पवार करत असून त्यांची ही वर्तणूक चुकीची असून “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणतेही उत्तर न देणाऱ्या नेत्यांना जनता योग्य जागा दाखवेल,” असे प्रतिपादन शेतकऱ्यांनी केले आहे. अशा घटनांमुळे आमदार पवारांवर टीकेची झोड उठली असून, समाजातील विविध स्तरातून या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. याबाबतीत ॲड.अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी तळेगाव ढमढेरे येथे सभेस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. कायद्यासमोर सर्व उमेदवार हे समान असून कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारात,रॅली ,सभा येथे निषेध अथवा बॅनर बाकी करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!