प्रतिनिधी राजाराम गायकवाड
गणेशोत्सव, भक्ती आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम,३०० मोफत चष्मे वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, कीर्तन , खेळ पैठणीचा आणि दिव्यांगांचा सुरेल ऑर्केस्ट्रा असे कौतुकास्पद कार्य करणारा समाजभान जपणारा मंडळ ठरला शिक्रापूरकरांचा मानाचा तुरा
शिक्रापूर ( ता.शिरूर) युवाशक्ती, सामाजिक जागृती आणि समाजभान जपणारी अनोखी गणेश भक्ती अशा त्रिवेणी संगम साधणाऱ्या शिक्रापूर येथील श्रीमंत गणराज मित्र मंडळाने यंदाचा २६ वा गणेशोत्सव अविस्मरणीय बनवला आहे. ‘सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय’ या विचारांनी प्रेरित होऊन, या मंडळाने गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने समाज सेवा व परिवर्तनाचे माध्यम बनवले आहे. मंडळाच्या या उपक्रमांमुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता, तो एक गौरवशाली सामाजिक विधायक उपक्रम राबवणार आदर्श मंडळ ठरला आहे.
समाजसेवा आणि आरोग्याची मोहीम – यंदा मंडळाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. नेत्र तपासणी व चष्मे वाटप: मंडळाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ३०० गरजू लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. हा उपक्रम डोळ्यांना ‘दृष्टी’ देणारा आणि जीवनात ‘प्रकाश’ आणणारा ठरला.

रक्तदान महादान: आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ११२ रक्तपिशव्या संकलित झाल्या. मंडळाच्या या कार्यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले, जे कोणत्याही पुजा-अर्चनेपेक्षा श्रेष्ठ आहे.
पर्यावरण आणि शिक्षणही महत्त्वाचे : सामाजिक उपक्रमांसोबतच मंडळाने पर्यावरण आणि शिक्षणालाही महत्त्व दिले.
वृक्षारोपण: पर्यावरणाचे रक्षण करण्याचे महत्त्व ओळखून, मंडळाने वृक्षारोपण कार्यक्रम राबवला आणि सहभागींना वृक्ष वाटप करून निसर्गाप्रती आपली जबाबदारी जपली.
विद्यार्थ्यांना वह्या वाटप: मंडळाच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येणारा उपक्रम याही वर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. दुर्लक्षित वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी समाजाने गोरगरिबांच्या मदतीला धावून आले पाहिजे हा कृतियुक्त संदेश देण्यात आला.
सर्वसामावेशक सांस्कृतिक उपक्रम : मंडळाने गणेशोत्सवामध्ये सर्व घटकांना सामावून घेतले. कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषा गडदे यांच्यावतीने
दिव्यांग बांधवांचा ‘साई सप्तसूर परिवार‘चा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हा कार्यक्रम कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषा गडदे यांच्यावतीने आयोजित कराहयत आला होता. ह.भ.प. वैभव महाराज गाढवे यांच्या कीर्तनाने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले, तर ‘होम मिनिस्टर’सारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी सर्वांना आनंद दिला.शिक्रापूरच्या श्रीमंत गणराज मंडळाने सामाजिक उत्सवाचा आदर्श निर्माण आहे.
अध्यक्ष शुभम चव्हाण, उपाध्यक्ष ऋषिकेश गडदे, सचिव हार्दिक रमेश गडदे आणि खजिनदार नागेश डोंगापुरे यांच्या नेतृत्वाखालील या मंडळाच्या अथक परिश्रमामुळे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उत्सव यशस्वी झाला. हा उत्सव केवळ शिक्रापूरसाठीच नव्हे, तर इतर मंडळांसाठीही एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
भव्य मंडप ,आकर्षक रोषणाई, सुंदर गणेश मूर्ती आणि महिला भगिनी व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे, फायर सेफ्टी सिलेंडर, वाळूने भरलेल्या बादल्या तसेच ठिकठिकाणी लावलेले सामाजिक संदेश तसेच विसर्जन मिरवणुकीत महत्त्वपूर्ण गोष्टींची घेतलेली काळजी यामुळे या श्रीमंत गणराज मित्र मंडळाचा गणेशोस्तव एक सामाजिक उपक्रमांचा व सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श गणेशोस्तव ठरला.
मंडळाचे मार्गदर्शक आदर्श सरपंच रमेश गडदे, गणेश खरपुडे , संकेत गडदे,भरत खोले, मनोज गायकवाड अभिजित खोले, सागर खरपुडे,गणेश सातकर , समीर टेमगिरे,कानिफ शिर्के अमित वाघोले व इतर मान्यवरांनी उत्सव यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
