शिक्रापूर ता.शिरूर, दि. २३ मार्च — शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ₹३४,९७२ रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ३० लाखांहून अधिक निधीचे वितरण शिक्रापूर ग्राम नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला.
धनादेश वितरण प्रसंगी शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, उषा राऊत, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिनकरराव कळमकर, ग्रामदैवत भैरवनाथ ट्रस्टचे सचिव अर्जुन शिर्के, कुदळे सर, मचे सर , युवा उद्योजक दीपक भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड, मोहम्मद तांबोळी आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत अशा प्रकारच्या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना दिलासा मिळत असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले.