विश्व मानवाधिकार संस्थेतर्फे अशोक बालगुडे यांना पीएच.डी. प्रदान

Swarajyatimesnews

पुणे –  जम्मू-काश्मीर येथील ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्टतर्फे दैनिकाचे  उपसंपादक अशोक बालगुडे यांना बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्धी माध्यमाचे योगदान या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी मानद पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून चेअरमन डॉ. एच. आर. रेहमान आणि सेक्रेटरी परमजीत सिंग यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

उपसंपादक अशोक बालगुडे यांच्या या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते डॉ. गणेश राऊत आणि  संपादक श्रीकांत साबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी  उपसंपादक सागर जाधव आणि इतर सहकारी उपस्थित होते.

बालगुडे यांनी ४० वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत समाजसेवा केली आहे. त्यांनी १९८२ साली मुंबईमध्ये नोकरीला सुरुवात केली, त्यानंतर पत्रकारिता आणि सोशल सायन्समध्ये पदवी मिळवून अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर लिखाण केले. त्यांच्या बांधकाम क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना पीएच.डी. प्रदान करून गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!