हा
बांग्लादेशची राजधानी ढाका येथे सोमवारी परिस्थिती वेगाने बिघडली. लाखो आंदोलक गोनोभोबोनच्या दिशेने चालून येत होते. गोनोभोबोन हे बांग्लादेशच्या पंतप्रधानांच अधिकृत निवासस्थान आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, हीच आंदोलकांची एकमेव मागणी होती.